Tuesday, September 11, 2012


सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कविता

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो

न निश्चय कधी  ढळो उजन्विघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो
स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो

नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले
स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले
तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे  
जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे

पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे
दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे
प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे
म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे

कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली
पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली
सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा
लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा

दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे
रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे
असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे

कवी: मोरोपंत 
शब्दांकन: एल बी राणा, पुणे (lbrana@yahoo.com)

16 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Hello, can you post the meaning of all the verses ? That would be awesome .... Thanks !

    ReplyDelete
  3. thanks.please post meanings too, it wil help much.

    ReplyDelete
  4. Keka means a cry or in marathi haak (to God) and avali meaning collection. Its a direct dialogue of poet with God (Krishna) in Arya vrutta.

    Here is the meaning for the 1st stanza

    May we always be granted by good company.
    May kind words always befall our ears.
    May our mind get rid of all stains and all thoughts impure
    May our hands never reach to defile that pristine lotus of the soul
    May our sole shine through our character.......

    ReplyDelete
  5. Please also see this book with complete meaning of the above poem
    :
    http://www.scribd.com/doc/24319678/Subodh-Kekavali-Marathi

    ReplyDelete
  6. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो (मोरोपंताची केकावाली)
    सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
    कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
    सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो
    वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो

    (meaning:मला निरंतर सत्संग लाभो सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येवो.
    साधुसंतांच्या कमलासारख्या निर्मळ व कोमल चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो, त्यांनी दूर ढकलिलें असतां हट्टानेंच त्यानें तेथें अडून राहावें आणि इतकें करूनही त्या सधुचरणांचा वियोग झालाच तर त्यानें (पोटभर) रडावें, (तरीपण) त्यानें तुमच्या चरित्रांच्या पवित्र कथेंत निहमी रंगून जावे.)

    न निश्चय कधी ढळो उजन्विघ्नबाधा टळो
    न चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो
    स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो
    पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो

    (meaning:माझे मन कधीही डळमळीत न होवो. दुष्टांनीं केलेल्या विघ्नांचा उपद्रव दूर होवो. चित्त तुमच्या भजनांत निश्चळ राहो. साधूंनीं सांगितलेल्या मार्गाकडे अन्तःकरण लागो. हृदयाला आत्मज्ञान लाभो. खोटा अभिमान साफ नाहींसा होवो. एकदा स्वच्छ होऊन भक्तिमार्गाला लागलेले मन पुन्हा विषयलालसेने मलीन न होवो आणि खर्या आत्मज्ञानाने सर्व पापाचे भस्म होवो)

    नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले
    स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले
    तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे
    जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे

    (meaning:जे नावडत असेल ते नेहमीच आपल्या दृष्टीला सदोष दिसते. उलट जे आवडते असेल ते जरी सदोष असेल तरीहि चांगलेच वाटते. चिखलात जरी रांगले तरी आपले मूल आईबापांना आवडतेच. लहानपणी धुळीने अंग लडबडून घेऊन तुम्ही कपडे मळवीत असां तरी पण माता यशोदा तुम्हाला आपल्या पोटाशी कवटाळीत असेच की नाही)

    पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे
    दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे
    प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे
    म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे

    (meaning:बाप चरी करंट्या पोराला विटला तर विटो. परंतु आई मात्र कधीहि विटत नाही. कुळाच्या कीर्तीला काळ्या काजळीप्रमाणे लागलेल्या त्या करंट्या पोरामुळे दयामृताचा ओलावा जिच्या अंतरंगात निरंतर आहे अशी ती माउली कधीहि (रागाने किंवा तिरस्काराने) गढूळ होत नाही. इतर गुरूंचे कृपावस्त्र झाकते खरे पण ते एकंदरीत अपुरेच पडते. (आईचे कृपावस्त्र मात्र बाळाला भरपूर पुरेसे होते) याच कारणास्तव सज्जन म्हणतात की जन्मदात्या मावलीचे ऋण कधीही फिटत नसते)

    कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली
    पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली
    सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा
    लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा

    (meaning:यमाच्या सैन्याचे पांढरे निशाणच असे म्हातारपण नजरेच्या टप्यात आले आहे. यमाच्या स्वारीच्या अघाडीचे योद्धेच अशा रोगाबरोबर दोन हात करता करता हा थकून गेला आहे. तुझ्याहून ज्याच्या आंगी अधिक सामर्थ्य आहे असा दुसरा साह्यकारी कोणीच दिसत नाही. मग आताही जर मी अधीर होऊ नको तर या माझ्या शत्रूने गर्दन छाटलीच याची वाट काय)

    दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे
    रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे
    असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
    पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे

    (meaning:हे दयामृताच्या मेघा हरे या मयूराकडे (मोरोपंत कवीकडे) प्रसाद करण्याच्या हेतूने वळा. जे मूल रडते त्याला त्याची आई मोठ्या कळवळ्याने उचलून कडेवर घेते. धर्मनिष्ठांनी ज्याच्या पावलांची स्तुति केली आहे अशा परमेश्वरा, असा याचक आपल्याला कोठे आढळेल. आपले दास पापभाराने कितीही जड झाले असेल तरी या संसारसागरांत त्यांना उचलून परतीरला लावणे तुम्हाला खास कठीण नाही.)

    ReplyDelete
  7. अर्थ कळवल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  8. There are many mistakes while writing like the 1st line of 2nd stanza is as follows:
    न निश्चय कधी ढळो कुजनविघ्नबाधा टळो
    न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो

    ReplyDelete
  9. मोरोपंत रचीत केकावली मधील ही रचना आज आठवण्याचे कारण माझा एक मित्र प्रकाश देशपांडे .

    त्याच्या एका मेसेज मधे संदर्भ आला आणि मन भूतकाळात गेलं .

    लहानपणी साधारणतः १९७० दरम्यान अंबाजोगाई मधील भट गल्लीत राहायला असताना , आठवड्यातून एक दिवस आम्हाला राम मंदिरात जावे लागत असे .

    तेथे मारोती स्तोत्र , श्रीराम रक्षा , परवचा (उजळणी) आणि वरील रचना म्हणावी लागत असे .
    राम मंदिरासमोर एका कवठाच्या झाडाखाली विठ्ठल मंदिरात हा उपक्रम चाले .

    आज याची प्रकर्षाने आठवण होण्याचे अजून एक कारण म्हणजे माझे आजोबा माझ्या वडिलाना
    " मुलाना संगत चांगली पाहिजे , त्याचे मित्र चांगले पाहिजेत " असे सांगत असताना मी ऐकले आणि माझ्या बालमनात या संवादाची आणि मोरोपंतांच्या रचनेची एक पक्की गाठ पडली.
    आज मी ज्या टप्प्यावर आहे त्याचे श्रेय आई वडिलांचे संस्कार , समाजाचे ऋण या सोबतच सर्व मित्र - मैत्रिणी याना जाते .

    हे व्यक्त करण्यासाठी आज मैत्री दिन हाच योग्य मुहूर्त आहे असे वाटले म्हणून हा शब्द - प्रपंच !


    धन्यवाद .


    ReplyDelete
  10. अतिशय छान केकावली व लहानपणी ही म्हणावीच लागत असे - अजूनही गुरुवारी आरती नंतर आम्ही ही म्हणतोच - - हे आपल्याला आई वडील व आजोबांकडून मिळालेले उत्तम संस्कार अजूनही छान वाटतात - -🙏🙏

    ReplyDelete
  11. सायकलने नर्मदा पारिक्रमा करताना मोरोपंतांच्या केकावलीचा अक्षरशः अनुभव घेतला...

    धन्यवाद राणा...☺️👍☺️

    ReplyDelete
  12. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  13. सार्धधी म्हणजे काय

    ReplyDelete